Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

नगरविकास मंत्र्यांकडून बेळगावच्या विकासकामांचा आढावा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक इशारा

    बेळगाव : सुवर्ण विधानसौध येथे नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव महापालिका आणि बुडाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी कडक शब्दांत सुनावत कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. बेळगाव, धारवाड आणि कलबुर्गी शहरांमध्ये एल अँड टी …

Read More »

बेळगाव मनपावर कन्नड संघटनांचा दबाव; ‘अविभाज्य कर्नाटक’ ठरावाची मागणी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेत ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ असा ठराव तातडीने मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी नगरविकास मंत्री यतिंद्र सिद्दरामय्या यांची भेट घेत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून महापालिकेत संबंधित ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी …

Read More »

भरधाव कारचा शिक्षिकेला जोरदार धक्का; अपघातानंतर चालकाने काढला पळ

  बेळगाव : शहरात बेफाम वाहन चालवणे पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. शाळेत कर्तव्यावर जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक देऊन गंभीर अपघात घडविला. धडक दिल्यानंतर जखमी शिक्षिकेला रस्त्याच्या कडेला बसवून कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने संतापाची लाट उसळली आहे. माहितीनुसार, टिळकवाडी येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक ९ मधील …

Read More »

सिद्धरामय्या राजकारणातून निवृत्त होणार नाहीत : मंत्री यतींद्र सिद्धरामय्या

  बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले असले, तरी त्याचा अर्थ ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहेत असा अजिबात नाही, असे नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले असले, …

Read More »

विजेच्या धक्क्याने यंत्रमाग कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : यंत्रमागावर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका विणकर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी वडगाव येथील सपार गल्लीमध्ये घडली. या प्रकरणाची नोंद शहापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत कामगाराचे नाव द्यामण्णा ऊर्फ पुंडलिक चंद्राप्पा अंची (वय ३४) असे आहे. …

Read More »

शारदा विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

  बेळगाव : येथील शारदा विद्यालयात शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका स्वाती घोडकेकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व शाळेच्या शिक्षिका सौ. दिव्या …

Read More »

विहान कपिलेश्वरकरची भारतीय कराटे संघात निवड

  बेळगाव : मूळचा बेळगावचा सध्या बंगळूर येथे वास्तव्यास असलेला विहान मंदार कपिलेश्वरकर याची भारताच्या कराटे संघात निवड झाली असून, तो जपानमधील नाहा, ओकिनावा येथे आयोजित ‘द थर्ड ओकिनावा कराटे वर्ल्ड फेस्टिव्हल डेमॉन्स्ट्रेशन अँड टूर्नामेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी बंगळूरहून जपान येथे भारतीय कराटे संघाने नुकतेच प्रयाण झाले आहे. …

Read More »

भटकी आणि पाळीव कुत्री अन् कायदेशीर जबाबदारी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मारुती कामाण्णाचे यांचे मार्गदर्शन

  बेळगाव : शहर आणि परिसरात भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी नागरिकांना पाळीव प्राण्यांचे संगोपन, भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रण आणि संबंधित प्रशासनाच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. ॲड. कामाण्णाचे यांच्या मते, …

Read More »

मुख्यमंत्री विजय यांना मद्रास उच्च न्यायालयाचा झटका; करुर चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा निर्णय रद्द

  चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. करुर येथील रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ४१ जणांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती सी. व्ही. कार्तिकेयन आणि आर. शक्तीवेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटले की, …

Read More »

मराठा मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

  बेळगाव : मराठा मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे “Design to Safety: Drug Discovery and Pharmacovigilance” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेस कर्नाटक, कोल्हापूर, पुणे, मुंबई, वडोदरा व राजस्थान येथील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर व पदवी विद्यार्थी तसेच प्रतिनिधी असे एकूण २२८ जण …

Read More »