Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव बायपासचे पॅकेज-1 तातडीने सुरू करा; खासदार जगदीश शेट्टर यांची केंद्रीय मंत्रालयाकडे मागणी

  नवी दिल्ली/बेळगाव : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बेळगाव बायपास प्रकल्पातील पॅकेज-1 चे काम पॅकेज-2 आणि 3 ची प्रतीक्षा न करता तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव उमाशंकर यांच्याकडे केली. बुधवारी झालेल्या बैठकीत शेट्टर यांनी सांगितले की, पॅकेज-2 आणि …

Read More »

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणात तपासाला वेग; दोन गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

    बेळगाव : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये 14 जुलै रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी अधिक तीव्र केला असून, या प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे …

Read More »

निपाणी मतदारसंघातील एसआयआर कामकाज समाधानकारक असल्याची सुप्रिया पाटील यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील यादीची सखोल फेरतपासणी म्हणून एसआयआरचे कामकाज सुरू होते. शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वीच हे काम अंतिम टप्प्यात आल्याची बाब समाधानकारक असल्याची माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी दिली. पुढील काळातील निवडणुकीच्या दृष्टीने एस आय आर चे कार्य महत्वपूर्ण आहे. शहर आणि ग्रामीण भागात …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील खरी कॉर्नर वरील पुलाची भिंत किरकोळ पावसातच कोसळली

  निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापर्यंत सुरू आहे. महामार्गामुळे महात्मा गांधी हॉस्पिटल, हरी कॉर्नर, यरनाळ, शिरगुप्पी परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांच्या सोयीसाठी खरी कॉर्नर परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. पण त्यातील काही भाग पहिल्या किरकोळ पावसातच ढासळला आहे. त्यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस; सतीश जारकीहोळींच्या हालचालींनी राजकीय चर्चेला उधाण

    बेळगाव : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपद द्यावे, याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह …

Read More »

विश्वकर्मा समाजाच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे योगदान

  खानापूर : श्री विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्ट, खानापूर यांच्या मंदिराच्या जागेसंदर्भातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, संबंधित पीटीसी (PTC) नकाशा ट्रस्टच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ट्रस्ट पदाधिकारी, सभासद आणि समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले की, …

Read More »

गुरू – शिष्य नाते : आत्मोन्नतीचा शाश्वत मार्ग

  जगात अनेक कला, विद्या आणि शास्त्रे आहेत. त्या शिकविणारे गुरू, शिक्षक आणि प्राचार्य शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मिळतात. या विद्यांमुळे माणसाला उपजीविका, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखाची साधने प्राप्त होतात. परंतु भौतिक सुखाची साधने मिळाली म्हणजे मानसिक समाधान मिळतेच असे नाही. अधिकाधिक सुखाच्या शोधात माणूस धावत राहतो; पण अंतःकरणातील शांती, …

Read More »

अथणीतील वेंकटेश्वर लॉजवर पोलिसांची धाड; देहविक्री प्रकरणी दोघांना अटक, महिलांची सुटका

  बेळगाव : अथणी शहरातील गांधी मार्केट परिसरातील वेंकटेश्वर लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून काही महिलांची सुटका केली असून, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेंकटेश्वर लॉजमध्ये देहविक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात लॉज व्यवस्थापक रुद्रप्पा नावलगी …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता विक्री प्रकरण; आरोपीला अटक

  उपनिबंधक कार्यालयातील गैरव्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी बेळगाव : बेळगाव येथील उपनिबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःलाच मालमत्तेचा मूळ मालक असल्याचे भासवत दुसऱ्याची मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी पिरणवाडी येथील लक्ष्मण देसाई (वय ६२) याला पोलिसांनी अटक केली आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात आरोपीने बनावट ओळखपत्रे व कागदपत्रांच्या …

Read More »

स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये कारगील विजय दिन

  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल, पी.जी. विद्यामंदिर आणि कोल्हापूर येथील सह्याद्री ट्रेनिंग फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिन कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कारगील युद्धातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शाळेतर्फे सह्याद्री ट्रेनिंग फोर्सच्या पदाधिकाऱ्यांचा …

Read More »