बेंगळूरू : शिक्षण हा विकासाचा पाया मानला जात असला तरी कर्नाटकमध्ये माध्यमिक स्तरावर शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने प्रसिद्ध केलेल्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) अहवालात ही …
Read More »साखरेच्या दराने गाठली पन्नाशी; श्रावणात गोडवा झाला महाग, सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार
बेळगाव : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसू लागला आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ४९ ते ५२ रुपये इतका झाला असून, अवघ्या पंधरा दिवसांत सातत्याने दरवाढ झाल्याने दैनंदिन वापरातील चहासह गोड पदार्थही महागले आहेत. त्यामुळे महिन्याचे घरगुती बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, घाऊक बाजारात …
Read More »आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अजिंक्य रहाणेचा निरोप; भावनिक पोस्टद्वारे केली निवृत्तीची घोषणा
मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. रहाणेने आपल्या पोस्टमध्ये, “कॅप 278 आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन,” असे लिहित …
Read More »कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी
साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे ; शब्दगंध कवी मंडळ संघाचे आवाहन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘गंध मातीचा’ हा कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी …
Read More »प्रतिभा पोषक परीक्षेत अक्कोळ हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
निपाणी (वार्ता) : राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व हुशार विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये अक्कोळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अक्कोळ हायस्कूलचे श्लोक, चिमगावे, स्नेहल, रेंदाळे, चैत्राली किल्लेदार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रतिभा पोषक परीक्षेत …
Read More »कोट मराठी शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा
दड्डी : कोट येथील मराठी प्राथमिक शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच निसर्गाविषयी प्रेम आणि जबाबदारीची भावना रुजावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. शशिकांत शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना …
Read More »श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न
बेळगाव : महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमेच्या पावन निमित्ताने बुधवारी (दि. २९ जुलै) विविध धार्मिक कार्यक्रमांनी युक्त गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने श्री स्वामी समर्थ अभिषेक व पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेदमंत्रांच्या मंगल घोषात संपन्न झालेल्या अभिषेक …
Read More »मुक्तांगण विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
बेळगाव : आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मराठा मंडळाचे निवृत्त मुख्याध्यापक नारायण बाळेकुंद्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हर्षिता हुगी यांनी स्वागत करून केली. त्यानंतर रोहित बजंत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी रितिका …
Read More »एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी योगगुरू एस. बी. कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद करणारी भाषणे अनंत लाड, संगीता बागी …
Read More »तारीख पे तारीख! कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुन्हा लांबणीवर
बेंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकच्या राजकारणात मोठे कुतूहल निर्माण झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला “तारीख पे तारीख” मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी होणारी महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली. आता ही बैठक गुरुवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta