Sunday , September 20 2026
Breaking News

खेळांमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक विकासास मदत : विजयालक्ष्मी मण्णीकेरी

Spread the love

 

बेळगाव : खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळांमुळे आपला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक विकास होण्यास मदत मिळते, असे विचार रोटरी क्लब दर्पणच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी मण्णीकेरी यांनी व्यक्त केले.
विजयालक्ष्मी मण्णीकेरी या हॉकी बेळगांव, रोटरी क्लब दर्पण व रोटरी क्लब नाॕर्थतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान येथे आयोजित वरिष्ठ व कनिष्ठ मुलींच्या प्रदर्शनीय हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होत्या.
या स्पर्धेत कनिष्ठ संघाने वरिष्ठ संघावर 1-0 गोलने विजय प्राप्त केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या चषक देण्यात आले.
प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हाॅकीची माहिती व पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हाॅकी बेळगांव मधून डीवायईएसमध्ये निवड झालेल्या हाॅकीपटूंची माहिती दिली.
यावेळी रोटरी दर्पणच्या सचिव कावेरी करुर, संचालिका सविता वेसणे, रोटरी नाॅर्थचे संचालक सोमशेखर सुतार, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू देशनूर, प्रफुल्ल काळोजी, विकास कलघटगी, सुरेश पोटे, दत्तात्रय जाधव, एस एस नरगोदी, दीपक वेसणे, शिवानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, आशा होसमनी, सुप्रिया कारेकर, प्रिया जैन, स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *