Sunday , September 20 2026
Breaking News

घरकुल लाभार्थींची १५ जूनपूर्वी निवड न केल्यास नगरपालिकेसमोर विलास गाडीवड्डर यांचा उपोषणाचा इशारा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सर्वसामान्यांसाठी शासनाने राबवलेल्या घरकुल योजना पूर्ण झाली आहे. पण लाभार्थींना घरकुल हस्तांतरित करण्यासाठी श्रेय वादाचे राजकीय नाट्य रंगले आहे. अशा परिस्थितीत योग्यलाभार्थ्यांची निवड १५ जून पूर्वी चिठ्ठी काढून करावी. अन्यथा नगर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

निवेदनातील माहीती अशी, निपाणी नगरपालिका आणि राजीव गांधी गृहनिर्माण महामंडळ यांच्यामार्फत पट्टणकुडी हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या एएचपी युनिट अंतर्गत जी+२ प्रकारचे अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. २० मे ला झालेल्या आश्रय समितीच्या बैठकीद्वारे लाभार्थ्यांना घरे वाटप केली जाणार होती.पण लाभार्थ्यांच्या निवडीपूर्वी, काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळामुळे २१ मे रोजी वृत्तपत्रीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांची निवड रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आपण नमूद केल्याप्रमाणे एक पत्र दिले आहे, त्यानुसार लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. लाभार्थ्यांची निवड दोन आठवड्यात आत चिठ्ठी काढून करावी. या कालावधीत लाभार्थींना घरे हस्तांतरित न केल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन केले जाईल.
या निवेदनाच्या प्रती पालिका आयुक्त, बेळगाव उपायुक्त कार्यालय, प्रकल्प संचालक, बेळगाव जिल्हा शहरी विकास कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, औ मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार शहर पोलीस ठाण्याला पाठवण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *