Sunday , July 26 2026
Breaking News

सीसीबी पोलिसांची मोठी कारवाई; 9.50 लाखांचे हेरॉईन जप्त, तिघे अटकेत

Spread the love

 

बेळगाव : शहर गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 9 लाख 50 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 10 लाख 31 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने 8 जून रोजी तांगडी गल्ली येथील महादेव मंदिरामागील मोकळ्या जागेत छापा टाकला. त्यावेळी आरोपी हेरॉईनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या कारवाईत निझिल नारायण बल्लारी (वय 24, रा. रेल्वे क्वार्टर्स, स्टेशन रोड), कपिल गजानन होसूरकर (वय 18, रा. मुजावर गल्ली) आणि आकाश आनंद साळुंखे (वय 34, रा. मुजावर गल्ली) या तिघांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून 466 छोट्या पुड्यांमध्ये पॅक केलेले 47.29 ग्रॅम हेरॉईन (किंमत 9.50 लाख रुपये), 70 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची सुझुकी अव्हेन्यू स्कूटर, 10 हजार 800 रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली.

चौकशीदरम्यान हे हेरॉईन मुंबई येथील एका महिलेच्या माध्यमातून आणल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 21(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल सीसीबीच्या पथकाचे पोलीस आयुक्त व उपपोलीस आयुक्त यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *