Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी आयुक्तांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतील एजंटराजसह विविध प्रकारचे दाखले, उतारे देण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या मागणीवरून संतापलेल्या नागरिकांनी गेल्या आठवड्यात थेट नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी येथील कर्मचारी राहुल कदम याच्या बदलीचा आग्रह नागरिकांनी धरला. यासाठी सोमवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना कारवाईबद्दल विचारणा केली. त्यावेळी निपाणी पालिकेतील प्रशासन सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकारी विवेक जोशी यांनी दिले. याबाबतचे निवेदन ही पालिका आयुक्त गणपती पाटील यांना देण्यात आले.
नागरिकांनी कदम यांच्या बदलीचा आग्रह धरला. मात्र बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून कदम याच्याविरोधातील तक्रारींचा उल्लेख करून त्याची बदली करण्याची मागणी करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अधिकारी विवेक जोशी यांनी दिली. बदली होईपर्यंत उताऱ्यासंदर्भातील कोणतेही काम कदम यांच्याकडे देणार नसल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी, नगरपालिका प्रशासनाने याबाबतची कार्यवाहीने केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी अनिल भोसले, बक्तीयार कोल्हापुरे, गणेश निंबाळकर, सुनील शेलार, चेतन चव्हाण, फारुख गवंडी, नंदकुमार कांबळे अल्लाबक्ष बागवान नावेद देसाई, सौरभ केसरकर, गणेश चव्हाण, खलील बागवान, सलीम मुल्ला, सोमनाथ कोरवी, हसन कोल्हापुरे, सुंदर पोटले, अजाज पकाली, गणेश लाखे, शुभम कोरवी, गणेश कोरवी, सुरज साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *