Sunday , September 20 2026
Breaking News

यांत्रिक युगातही ग्रामीण भागात अजूनही सर्जा- राजाच्या जोडीने पेरणीची कामे

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मनुष्यबळाची कमतरता, शेतातील कामे वेळेत उरकण्यासाठी यंत्रांची मागणी वाढत आहे. यांत्रिकीकरण युगातही सर्जा-राजाची खिलार जोडीचे महत्त्व आजही निपाणी ग्रामीण भागात टिकून आहे. गावोगावी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच अनमोल अशी पशुसंपदा शिल्लक आहे. खर्च परवडेना तरीही हौसेखातर तर काही ठिकाणी ग्रामीणमध्ये भागातील शेतीसाठी आजही पेरणी व इतर कामासाठी बैलांचा वापर केला जात आहे.
अलीकडच्या काळात बैलजोडी सांभाळणे खूप खर्चिक झाले आहे. वाढते पशुखाद्याचे दर आणि पालनासाठी गुंतणारा माणूस याचा खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने बैलजोड्या कमी झाल्या आहेत. शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्नत्यामुळे गावोगावी पडीक जमिनी मोठ्या प्रमाणात राहात आहेत. काही शेतकरी लाखो रुपये खर्चुन बैलजोडी सांभाळत आपल्या जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे घरच्या बैलजोडीची परंपरा खूप वर्षांपासून आहे. सध्या बैलजोडी सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. यंत्राणे शेती होत असली, तरी ग्रामीण भागात बैलांशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया अंमलझरी येथील युवा शेतकरी सचिन कौंदाडे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *