Sunday , July 26 2026
Breaking News

तीन मुली झाल्याने विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरोधात महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : तीन मुली जन्माला आल्याच्या कारणावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ करून दुसरे लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पती, सासरे आणि नातेवाईकांसह पाच जणांविरोधात बेळगाव महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमन प्रसाद वाकुडे (वय 26, रा. सध्या शास्त्रीनगर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 22 एप्रिल 2021 रोजी शिवमोग्गा येथील प्रसाद वाकुडे याच्याशी झाला होता. विवाहानंतर त्या पतीच्या घरी राहत होत्या. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असताना 31 जुलै 2022 रोजी त्यांना जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यानंतर पती प्रसाद वाकुडे याने “घरात सर्वांना मुलगे झाले आहेत, तुला मुलीच का होतात” असे म्हणत किरकोळ कारणांवरून मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीनुसार, पती दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ करीत मारहाण करत असे. तसेच दुसऱ्या गर्भधारणेदरम्यानही मुलगीच होईल, असे म्हणत मानसिक त्रास दिला जात होता. 2 डिसेंबर 2024 रोजी तिसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर पती, सासरे नारायण वाकुडे, चुलत सासू वीणा वाकुडे, ज्योती वाकुडे आणि नातेवाईक लक्ष्मण शिंदे यांनी मिळून पतीला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. तसेच घटस्फोटास संमती देण्यासाठी दबाव टाकत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जुलै 2025 मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले. त्यानंतर पत्नी व तीन मुलींची कोणतीही विचारपूस न करता उदरनिर्वाहासाठी खर्चही दिला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वी सप्टेंबर 2025 आणि मार्च 2026 मध्ये महिला पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जाद्वारे देण्यात आले होते. मात्र सामोपचाराचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर संबंधितांविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी महिला पोलीस ठाण्यात पती प्रसाद नारायण वाकुडे, सासरे नारायण यल्लप्पा वाकुडे, वीणा पांडू वाकुडे, ज्योती श्रीनिवास वाकुडे आणि लक्ष्मण शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *