निपाणी (वार्ता) : निपाणी शहराबाहेरील रोहिदासनगर मधील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. पौर्णिमेनिमित मंदिरातील मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी दिवसभर भाविकांनी दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती. काकड आरती, सकाळी माऊलींच्या मूळ मूर्तीस अभ्यंगस्नान, अभिषेक घालून आरती झाली. त्यानंतर ५१ महिलांच्या उपस्थितीत पारायण झाले. …
Read More »अक्कोळ येथील पार्श्वभूमी विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वितरण
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अक्कोळ गावचे गावकामगार पाटील राजू पाटील होते. प्रारंभी आचार्य श्री १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी शालेय गणवेश आणि शैक्षणिक …
Read More »निपाणी, ममदापूर येथे सिद्धोजीराजे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जोल्ले शिक्षण संस्था संचलित श्रीमंत सिद्धोजीराजे पदवीपूर्व कॉलेजमध्ये सिद्धोजीराजे राजे यांची पुण्यतिथी झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दादाराजे निपाणकर -सरकार उपस्थित होते. यावेळी दादाराजे यांनी सिद्धोजीराजे यांच्या कार्याला उजळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे माहिती दिली. कार्यक्रमास …
Read More »विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा
प्राचार्य एम. एम. हुरळी; बागेवाडी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. त्यासाठी आता सर्व ठिकाणी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या आवडीनिवडीनुसार तर त्यामध्ये काम करावे, असे आवाहन प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी …
Read More »बेळगावला दररोजची विमानसेवा पुन्हा सुरू करा; केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार जगदीश शेट्टर यांची मागणी
बेळगाव : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजारापू यांची भेट घेऊन बेळगाव–बंगळुरू आणि बेळगाव–नवी दिल्ली या मार्गांवरील इंडिगोची दैनंदिन विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शेट्टर यांनी मंत्र्यांना सांगितले की, १६ जून २०२६ पासून इंडिगोने बेळगाव–बंगळुरू मार्गावरील विमानसेवा आठवड्यातील …
Read More »बिजगर्णी हायस्कूलचे क्रीडांगण उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज
बिजगर्णी : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धां उद्यापासून बिजगर्णी हायस्कूलच्या पटांगणावर होत आहेत. पहिल्यांदाच बेळगाव पश्चिम ग्रामीण भागातील सतरा माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर एकत्रितपणे या क्रीडा गंणावर विविध खेळांचा थरार पहायला मिळणार आहे. सांघिक कबड्डी, खो- खो, हाॅलीबाॅल, थ्रोबाॅल, वैयक्तिक …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील निट्टूर, यडोगा, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर, भंडरगाळी, निडगल आणि बरगाव या गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक …
Read More »गुरु पौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ जयतीर्थ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार व्यासपीठावर उपस्थित होते . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ओंकार …
Read More »बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिला गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला लॅपटॉप
निपाणी (वार्ता) : मिरापुरहट्टी (ता. चिकोडी) येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी बेळगाव येथील जैन इंजीनियरींग महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. परिस्थितीने गरीब पण हुशार असलेली मुलगी तेजस्वीनी लकाप्पा कजज्जीडोने हिला लॅपटॉपची गरज होती. त्यामुळे तिने आपल्या वडिलांसह चिक्कोडीतील जिल्हा काँग्रेस कार्यालयात बुडा व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना …
Read More »महामार्गावरील उड्डाणपूलासह भराव काम दर्जेदार करण्याची रोहन साळवे यांची सूचना
निपाणी (वार्ता) : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाच्या भुयारी मार्गालगत नव्याने निर्माण केलेला भराव पावसामुळे कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आवताडे कंपनीचे कंत्राटदार विजय दाईगडे यांच्याकडून भराव खचण्यामागील कारणांची सविस्तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta