
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले.
या स्पर्धेत राजू दोडमणी, पृथ्वीराज तुळजाई, समर्थ पाटील, समर्थ डुकरे आणि अथर्व निकम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या या यशामुळे पाचही विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कार्लेकर आणि विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, आगामी स्पर्धेतही त्यांनी दमदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

Belgaum Varta Belgaum Varta