Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

Spread the love

 

 

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी उपपोलीस आयुक्त नारायण भारमणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गणेशोत्सव काळात ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक रात्री १० वाजल्यानंतरही खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. मात्र, काही ठिकाणी पोलिसांकडून दुकाने लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

व्यापाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सवाच्या काळात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी भाजप नेते धनंजय जाधव, प्रसाद मोरे, प्रेम चिखलकर यांच्यासह केळकर बाग परिसरातील तसेच शहरातील अनेक व्यापारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *