Sunday , September 20 2026
Breaking News

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभा निलजकर यांचा सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या एसडीएमसीतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शनिवारी सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी एसडीएमसीच्या सर्व सदस्यांच्या वतीने सौ. शोभा निलजकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

एसडीएमसीचे उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, निलजकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेला आदर्श शाळा बनविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे, असे सांगत त्यांनी निलजकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना सौ. शोभा राजाराम निलजकर म्हणाल्या, “मला मिळालेला हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या शाळेचा आहे. हे यश मी एकटीने मिळवलेले नसून आजी-माजी एसडीएमसी सदस्य, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.” याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी शाळेत पाण्याची कमतरता भासत असल्याची बाब लक्षात घेऊन निलजकर यांनी शाळेच्या वापरासाठी विहीर खोदणे तसेच त्यातून पाणी खेचण्यासाठी मोटार, पाइपलाइन आणि सिंटेक्स टाकी उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता १ लाख २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास एसडीएमसी अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. मुर्तिकुमार माने, श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री. मारुती यळगुकर, सदस्या सौ. अर्चना देसाई, सौ. ज्योती पाटील, सौ. प्रियंका सांबरेकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *