
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘जय गणेश श्री – 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले.
क्लब रोड येथील डॉ. संजय सुंठकर यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ट्रॅफिक विभागाचे असिस्टंट कमिशनर ज्योतिबा निकम, समाजसेवक विकास कलघटगी, दयानंद कदम, कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, राजेश लोहार, प्रवीण कणबरकर, विजय चौगुले यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना रॉ फिटनेसच्या वतीने ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि पदके देण्यात येणार आहेत. तसेच राजेश लोहार यांच्या मातोश्री कै. श्रीमती तायाक्का गणपती लोहार यांच्या स्मरणार्थ ‘जय गणेश श्री’ किताब विजेत्यास फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे. या फिरत्या चषकाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
याशिवाय स्पर्धेतील विजेत्यास चेतन तहसीलदार यांच्या वतीने सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास अनिल अमरोळे, नारायण चौगुले, सुनील बोकडे, सुनील चौधरी, भारत बाळेकुंद्री, बाबू पावशे, राजू पाटील, आधीत बेलेकर, गणेश दड्डीकर, रणजीत किल्लेकर, प्रसाद मरगाळे, विकी, दीपक कित्तुरकर आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta