
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन व मोफत वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात समितीचे नेते नेताजी जाधव, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण, जत्तीमठाचे सरपंच दत्ता जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, समितीचे नेते महादेव पाटील, शिवाजी हावळानाचे, राजकुमार बोकडे यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करत आपले मनोगत व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आरती संग्रहाचा लाभ व्हावा, तसेच पारंपरिक धार्मिक वातावरणात उत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजित मजुकर व सुनील बोकडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राकेश सावंत, यल्लापा मन्नोळकर, हेमंत शिंदे, देवाप्पा शहापूरकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रणजीत हावळानाचे यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta