
सुनील पडलीहाळे; कुर्ली येथे कुस्तीच्या आखाड्यात विद्यार्थ्यांचा दमदार खेळ
निपाणी (वार्ता) : शालेय जीवनात खेळांनामहत्त्व असून, कुस्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त, संयम, नेतृत्वगुण आणि संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळत असून कुस्ती ही जिद्द, ताकद आणि कौशल्याचा संगम असल्याचे मत निपाणी क्रीडा शिक्षणाधिकारी सुनील पडलीहाळे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील मराठा भवनात आयोजित तालुका पातळीवरील प्राथमिक व माध्यमिक गटातील मुला मुलींच्या कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष अरुण निकाडे होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा जोतिराम चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन झाले.
कुस्ती वस्ताद दत्ता कोकितकर, शिक्षक संघाचे सदस्य वाय. टी. पाटील यांचा सत्कार झाला. राष्ट्रीय कुस्ती पंच के. बी. चौगुले यांनी कुस्तीचे बदलते स्वरूप, नियम, खेळाचा सराव, विविध डावपेच, आहार व पालकांची खेळाबाबतची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. एल अरुण निकाडे यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडीवृत्तीने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन निपाणी तालुक्याचा नावलौकिक करण्याचे आवाहन केले. स्पर्धेला विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मुख्याध्यापिका अंजली अमृतसमन्नावर, एस. एन. पांडव, ज्योती कोरडे, श्रीनिवास पाटील, अमर शिंत्रे, संतोष निढोरे, नामदेव निकाडे, शिवाजी चौगुले, सीताराम चौगुले, ए. ए. चौगुले, अशोक माने यांच्यासह क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.
रवींद्र पाटील, सिद्धनेर्ली, के. बी. चौगुले, बाळासाहेब मेटकर -बानगे, संजय पाटील -दिंडनेर्ली यांनी कुस्ती स्पर्धेचे परीक्षण केले. मुला -मुलींच्या गटातील विजयी खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. चिक्कोडी तालुका मार्केटिंग सोसायटीचे उपाध्यक्ष बाबुराव खोत, विश्वास आबणे, आनंदा खोत, माजी पाटबंधारे अधिकारी, आदेश आबणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मत्तीवडे येथील शंभूराजे ज्युडो व कुस्ती संकुलचे प्रमुख कृष्णात माने व खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी दिनकर पोवार, डी. एस. चौगुले, सुधाकर व्हराटे, नवनाथ पाटील, वाय. टी. पाटील, एल. बी. बिरन्नावर, बी. एस. यल्लट्टी, सुरेश कांबळे, उदय पोवार, बी. एम. भोसले, सागर हिंग्लजे यांचे मार्गदर्शन लाभले. अशोक माने यांनी सूत्रसंचालन केले. श्रेयस शिंदे यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta