बेंगळुरू : भाजप नेते योगेश गौडर हत्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी आमदार विनय कुलकर्णी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हुबळी-धारवाड खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद नवाज आणि न्यायमूर्ती जी. बसवराजू यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने कुलकर्णी …
Read More »पक्ष मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यालाही संधी; पक्षनिरीक्षक डॉ. के जयकुमार
निपाणीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : एआयसीसीकडून कर्नाटकात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. पक्षाचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच काँग्रेसचा चिकोडी जिल्हा अध्यक्ष निवडला जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉ. के जयकुमार यांनी …
Read More »ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ
“कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी ह्या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार …
Read More »चर्मकार बांधवांसाठी ४१ वर्षे सेवाभावी कार्य; ए. आर. रुद्रेशी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
बेळगाव : लेदर इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (LIDKAR) चे बेळगाव जिल्हा संयोजक ए. आर. रुद्रेशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लेदर असोसिएशन ऑफ कर्नाटकच्या वतीने नेहरूनगर, बेळगाव येथील LIDKAR शोरूममध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ए. आर. रुद्रेशी यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. रुद्रेशी यांनी आपल्या ४१ …
Read More »बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी
बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथील अध्यापक आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांचे चिरंजीव बजरंग रवींद्र पाटील यांनी पुणे येथील झील कॉलेजमधून एमबीए (डिजिटल मार्केटिंग) ही पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह संपादन करून शैक्षणिक यशाची नवी भरारी घेतली आहे. मूळचे …
Read More »मंगाई यात्रेपूर्वी रस्ते व नागरी सुविधा दुरुस्त करा; अन्यथा मनपासमोर आंदोलनाचा इशारा
बेळगाव : मंगाई यात्रेला अवघे दहा दिवस शिल्लक असताना मंगाई नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि मूलभूत नागरी सुविधांचा अभाव याविरोधात मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक देत उपायुक्त उदयकुमार तलवार यांना निवेदन सादर केले. निवेदनात मंगाई नगर, वजह गल्ली, …
Read More »अलमट्टी धरण तुडुंब; सर्व 26 दरवाजे उघडले, कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग
विजापूर : कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, प्रथमच धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडून कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या अलमट्टी …
Read More »तब्बल १.९६ कोटींचा आर्थिक घोटाळा; सांबरा येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हा
बेळगाव : सांबरा येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह सोसायटीत तब्बल १ कोटी ९६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी सोसायटीचे तत्कालीन सेक्रेटरी भुजंग केदारी जोई (रा. सांबरा) यांच्याविरुद्ध मारीहाळ पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने …
Read More »युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : मुख्य आरोपीसह दोघे अद्याप फरार; अटक आरोपींची संख्या तीनवर
बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी प्रफुल्ल पाटीलसह आणखी दोघे संशयित अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी कॅम्प पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी दोघे पुणे येथील आहेत. गोळीबारानंतर आरोपी पुण्याकडे पसार झाल्याची …
Read More »बळ्ळारी नाल्यातील जलपर्णीमुळे शेतात पाणी; शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची भीती
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी, गाळ आणि कचरा साचल्याने पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतातील पाणी नाल्यात न जाता शेतातच तुंबून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta