Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

दारूच्या नशेने उद्ध्वस्त झाले कुटुंब; अल्पवयीन मुलाच्या फावड्याच्या घावात वडिलांचा अंत

  बेळगाव : दारूच्या नशेत रोज घरी येऊन पत्नी आणि मुलांशी भांडण, मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा अखेर स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या हातूनच दुर्दैवी अंत झाला. उद्यमबाग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून उद्यमबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे नाव बाळाप्पा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

  बेळगाव : दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेतील शिक्षिका शैला पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चौथी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भाषांतून भित्तीपत्रके तयार केली. …

Read More »

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त टिळक चौकात अभिवादन

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज (१ ऑगस्ट) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी किरण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य …

Read More »

स्विगी-झोमॅटोच्या धोरणांविरोधातील आंदोलनाला बेळगावच्या हॉटेल व्यावसायिकांचा ठाम पाठिंबा

  बेळगाव : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीच्या स्विगी आणि झोमॅटो या प्लॅटफॉर्मच्या व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला बेळगावमधील हॉटेल व्यावसायिकांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. ३० जुलै रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत बेळगाव हॉटेल मालक संघटना आणि नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) उत्तर कर्नाटक विभागाने …

Read More »

भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला उडवले; 48 मेंढ्या ठार, 15 गंभीर जखमी

      बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात जालिक्कोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने 48 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर 15 हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैलहोंगलहून बेलवडीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्ता ओलांडत …

Read More »

भाजपला धक्का : विधान परिषदचे उपसभापती प्राणेश कायदेशीर लढाईत पराभूत; काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांचा ९ मतांनी विजय

    बंगळूर : विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांनी भाजपचे उमेदवार तथा तत्कालीन विधानपरिषद उपसभापती एम. के. प्राणेश यांचा ९ मतांनी पराभव केला. निर्णयानंतर विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गायत्री शांतगौडा म्हणाल्या, “सत्याचा नेहमीच विजय होतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले …

Read More »

एकाही दोषीला सोडणार नाही – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  कोल्हापूर : अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनने माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र या प्रकरणांमध्ये जे जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी …

Read More »

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल नको : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (जिमाका) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीने पुरातत्व विभागाने या मंदिरा संदर्भातील कामकाज करावे असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. गेली काही दिवस मंदिराच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये नकारात्मक वृत्त प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

शिरगुप्पी ते ऑस्ट्रियापर्यंत संशोधकाची आकाशाला गवसणी

  प्रेरणादायी प्रवासाबद्दल भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन तर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी या छोट्याशा गावातून आकाश आनंदा कुंभार यांनी जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रियातील टेक्निकल विद्यापीठात त्यांची संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यांची ही गरुडझेप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे परिसरात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आकाश कुंभार यांच्या …

Read More »

सापाच्या दंशाने शट्टिहळ्ळीत बैल दगावला

      दड्डी : हुक्केरी तालुक्यातील शट्टिहळ्ळी येथे सापाच्या दंशामुळे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा सर्जा बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी लक्ष्मण भागोजी आसदे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बैलगाडीतून नाचणीची लागवड करण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यांच्यासोबत घरातील व शेजारच्या …

Read More »