







बेळगाव : गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सुरक्षितपणे पार पडावा, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून सोमवारी (दि. १४) टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस संचलन करण्यात आले.
बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपपोलिस आयुक्त तसेच गुन्हे व वाहतूक विभागाचे उपपोलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन झाले. यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF)चे जवान तसेच स्थानिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश या संचलनातून देण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना गणेशोत्सव शांततेत आणि परस्पर सौहार्द राखून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
‘आपली सुरक्षितता – आमची जबाबदारी’ हा संदेश देत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta