







बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच सोमवारी सायंकाळी बेळगावच्या आकाशात निसर्गाचा मनमोहक अविष्कार पाहायला मिळाला.
सायंकाळच्या आकाशात चंद्रकोर आणि चांदणीची सुंदर जोडी एकत्र दिसून आली. गणरायाच्या आगमनाच्या आनंदात या खगोलीय दृश्याने आणखी भर घातली. आकाशातील हे विलोभनीय दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसलेल्या या सुंदर नजाऱ्याचे नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात छायाचित्रण केले. भक्तिमय वातावरणात निसर्गानेही जणू गणरायाच्या स्वागतासाठी विशेष सजावट केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Belgaum Varta Belgaum Varta