







शहरात शंभर मंडळांची नोंद : पोलिस बंदोबस्ताचे नियोजन
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवादरम्यान पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ३०० पोलिसांसह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाची दररोज तपासणी करून व्यवस्थेबाबतची चौकशी होणार आहे.
शहरात सुमारे ८४३ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळाची तर ग्रामीण भागात ८१० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी सोमवार (ता. १४) पर्यंत झाली आहे. प्रत्येक मंडळाने जनजागृतीपर, देखावे सादर करावेत. याशिवाय प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
अति संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. अरुंद रस्ते असलेल्या परिसरात वाहतूक व्यवस्थित काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे.
बंदोबस्तासाठी मंडल पोलिसनिरीक्षक, सर्व ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल, साध्या वेशातील पोलिस, राज्य राखीव दलाच्या तुकडीसह होमगार्ड मदतीला राहणार आहेत.
शहरातील विविध मंडळाजवळ युवकांसह तरुणी आणि महिला या देखावे पाहण्यासह गणेश दर्शनासाठी येतात. या दरम्यान युवकांकडून हुल्लडबाजी होते. अशा ठिकाणी पोलिस विभागाकडून विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
——————————————————————–
‘शहर उपनगर आणि ग्रामीण भागात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांच्या चौकटीत उत्सव शांततेने साजरा करावा. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.’
-बी. एस. तळवार, मंडल पोलिस निरीक्षक

Belgaum Varta Belgaum Varta