Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी भागात विघ्नहर्ता गणेशाचे जल्लोषी स्वागत

Spread the love

 

 

सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची मिरवणूक; डॉल्बी बंदीमुळे पारंपरिक वाद्यांचा गजर

निपाणी (वार्ता) : यंदा पावसाची उघडीप, भाविकांचा उत्साह, ‘गणपती बाप्पां’चा गजर, फटाक्यांची आतषबाजी आशा बातावरणात सोमवारी (ता.१४) सकाळी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती भाविकांनी घरी नेल्या. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जल्लोषात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावर्षी डॉल्बीला बंदी घातल्याने बहुतांश मंडळांची स्वागत मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडली.
सकाळी ९ वाजल्यापासूनव येथील चाटे मार्केट, सटवाई रोड, नेहरू चौक, बेळगाव नाका, राम मंदिर, साखरवाडी संत सेना भवन व कुंभार वाड्यात बाप्पांना घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी दुचाकी, चारचाकी वाहनासह रिक्षातून बाप्पाला घरी नेले. त्यामुळे शहरातील विविध चौकात दुपारपर्यंत भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वरील परिसरातील सर्वच रस्ते वाहनधारक आणि नागरिकांनी भरून गेले होते.

गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पाच फळे व उदबत्ती इतर नैवेद्य खरेदीसाठीही भाविकांनी रस्ते फुलून गेले होते. सकाळी ११ नंतर घराघरात घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर आरती व नैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी तीन नंतर शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती आणण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली व इतर वाहनांचा वापर केला. रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या गणेश मूर्ती नेल्या जात होत्या. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली.
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर, ग्रामीण व बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे सर्वच रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.
—-
केळी, फळे महाग
घरगुती सह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पाच फळे व कच्च्या केळींची मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच रस्त्यासह गणेश मूर्ती विक्री परिसरात कच्ची केळी आणि फळांचे स्टॉल लावले होते. कच्ची केळी ४० ते ५० रुपये डझन तर पाच फळे ४० रुपये प्रमाणे विकली जात होती.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *