Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात डॉल्बी-डीजे-लेझरवर बंदी; पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन

Spread the love

 

 

आदर्श गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलिसांकडून पुरस्कार

बेळगाव : गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव पोलिस विभागाने यंदा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस विभागाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी तीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

गणेश मंडळांनी डॉल्बी आणि डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे तसेच शांतता आणि शिस्तीचे पालन करीत विसर्जन मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले.

गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी असल्याचे आयुक्त निकम यांनी स्पष्ट केले. बंदीचे उल्लंघन करून या साधनांचा वापर करणाऱ्या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक वारसा आणि शिस्तबद्ध मिरवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *