Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवानिमित्त ‘आरती संग्रह’ पुस्तकांचे वाटप; श्री. रमेश पावले यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत श्री. रमेश पावले यांच्या पुढाकाराने ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ उपक्रम उत्साहात पार पडला.

भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव घराघरांत पोहोचावा, तसेच गणरायाच्या आरतीचा मंगलमय नाद प्रत्येक घरात घुमावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक व नागरिकांना यावेळी आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, किरण जाधव, गणेश दड्डीकर, कपिल भोसले, मोतेश बारदेशकर यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्ञान, संस्कार आणि भक्तीची परंपरा पुढे नेणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *