Sunday , September 20 2026
Breaking News

प्रगती मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : महात्मा फुले रोड शहापूर बेळगांव येथील प्रगती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित या सोसायटीची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या कार्यालयात संपन्न झाली. सोसायटीचे चेअरमन श्री. अजित ग. पाटील अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित चेअरमन श्री. अजित ग. पाटील व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक श्री. वामन जाधव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर दिवंगंत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चेअरमन श्री. अजित पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, सहकारी संस्थेत विश्वासार्हता महत्वाची असून संचालक, सभासद व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने संस्थेचा नावलौकिक वाढतो असे उद्गार काढले. तसेच संस्थेला यावर्षी 10,97,336.29 (दहा लाख सत्याण्णव हजार तीनशे छत्तीस रुपये एकोणतीस पैसे) इतका नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभासदांना यावर्षी 12% टक्के लाभांश आम्ही देणार असल्याचे सांगितले.
सध्या संस्थेमध्ये 7 कोटी 90 लाख ठेवी आहेत, 2 कोटी 58 लाख 95 हजार संस्थेने गुंतवणूक केली आहे, तर 5 कोटी 37 लाख 87 हजारांचे कर्ज वितरित केले आहे. सेक्रेटरी सौ. शोभा मणगुत्ती यांनी नफा तोटा, ताळेबंद व अंदाज पत्रकाचे वाचन केले.
सभेला व्हा. चेअरमन श्री. परशुराम रायबागी, संचालक श्री. वामन जाधव, श्री. नारायण पाटील, श्री. परशुराम संभाजी, श्री. परशुराम गोडसे, श्री. मनोहर निलजकर, श्री. विनय धामणेकर, सौ. स्वाती धामणेकर यांच्यासह सोसायटीचे लेखापरीक्षक श्री. आर. व्ही. देशपांडे, सभासद मंडळ, हितचिंतक उपस्थित होते.
शेवटी संचालक श्री. विनय धामणेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *