Sunday , September 20 2026
Breaking News

“गोविंदा रे गोपाला…!” निपाणीत दहीहंडीचा अभूतपूर्व उत्साह!

Spread the love
ढोल ताशाच्या निनादात संकेश्वरच्या पथकाने मिळविला मान
निपाणी (वार्ता) : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने निपाणी येथील चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाला. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा पथकांनी थरांवर थर रचत दहीहंडी फोडण्याचा थरार साकारला.
“अरिहंत उद्योग समूह, बोरगांव” यांच्या वतीने ठेवण्यात आलेले ₹ 1,31,000/- चे बक्षीस संकेश्वर येथील भगतसिंग तालीम  पथकाने गगनाला भिडणारे थर रचून पटकावले आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
जिद्द, धाडस, एकजूट आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडविणाऱ्या गोविंदा पथकांचा उत्साह आणि मेहनत कौतुकास्पद होती. आपली पारंपरिक संस्कृती व उत्सवांची परंपरा जपत सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी उपस्थित मान्यवर निपाणीचे माजी नगरसेवक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकातील बाळ-गोपाळ तसेच निपाणीकर नागरिक  होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सवाला विशेष रंगत आली.
सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, माध्यम प्रतिनिधी आणि हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व कार्यकर्ते व निपाणीकराचा यावेळी सत्कार करण्यात आला. विजेत्या पथकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *