Sunday , September 20 2026
Breaking News

कावळेवाडीत हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप एम. पी. मोरे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
संस्था उपाध्यक्ष अॅड नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक करुन राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी व्यासपीठावर आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव, शिवनेरी सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन जोतिबा मोरे, पारायण मंडळाचे अध्यक्ष हभप शिवाजी जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले, सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे, यल्लापा बुरुड, अर्जुन सुतार, केदारी कणबरकर, वाय. एन. गावडा, एस. एन. गावडे, ए. एम. यळुरकर, मारुती भ. मोरे, अण्णापा अष्टेकर, लक्ष्मण जाधव, पी. एस. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी पुंडलिक जाधव यांनी मनोगत व्यक्त करुन संत साहित्याची ओळख विद्यार्थी दशेत होत असल्याने संतांचे विचार प्रेरणादायी आहे संत विचार पुढे नेण्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असते. अशा उपक्रमातून संत साहित्याचा जागर होतो. पाठांतर केल्यानं एकाग्रता वाढते. संताचे उपकार आपल्यावर आहेत असे मौलिक विचार व्यक्त केले

हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धेत

प्रथम क्रमांक… श्रावणी शशिकांत गावडे, प्राथमिक शाळा कावळेवाडी, द्वितीय क्रमांक.. श्रृती शशिकांत गावडे, प्राथमिक शाळा कावळेवाडी, तृतीय क्रमांक वरद विनायक सुतार, बालवीर बेळगुंदी,
मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत
प्रथम क्रमांक दिव्या दत्तात्रय कोले, अतिवाड प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक.. हर्षिता दत्तू चौगुले, मराठी शाळा बेळवट्टी, तृतीय क्रमांक.. सानिका सुधीर बाचीकर, बिजगर्णी हायस्कूल.

यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, गौरव पत्र, सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यास्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
परिक्षक म्हणून शिक्षक के. जी. मेणसे व अशोक येटले यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन श्री मेणसे, आभार के. आर. भाष्कर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *