Sunday , September 20 2026
Breaking News

शिवठाण हायस्कूलचे लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

Spread the love

 

शिवठाण (ता. खानापूर) : येथील श्री रवळनाथ हायस्कूलच्या खेळाडूंनी लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

सांघिक स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ४x१०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम, तर ४x४०० मीटर रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.

वैयक्तिक स्पर्धांमध्ये लक्ष्मण कोलकार याने गोळाफेक व थाळीफेकमध्ये प्रथम, तर भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. दीपा शिरोडकर हिने लांब उडीत प्रथम क्रमांक मिळविला, तर श्रेया गावडे हिने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

याशिवाय समर्थ पाटील, विकी यळगुणावर, वासुदेव मिराशी, नम्रता पाटील, दीपा शिरोडकर व श्रेया गावडे यांनी विविध वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.

या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री. पी. टी. चोपडे, मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील तसेच टीम मॅनेजर श्री. एन. व्ही. नाईक, श्री. विलास पाटील, श्री. बी. व्ही. पाटील, श्री. एम. पी. गिरी सर, श्री. एम. एस. कदम व सौ. एस. एन. काजूनेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन श्री. वाय. एन. मजूकर सर व सेक्रेटरी श्री. प्रसाद मजूकर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *