Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात

  बेळगाव : डॉ. बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयात नुकताच महाविद्यालयाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी स्वरूपा सिंग यांच्या सुंदर आवाजात वंदे मातरम राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा कर्नाटक धारवाडचे कार्याध्यक्ष श्री. इरेश बी. अचंटगेरी होते. द.भा. हिंदी प्रचार सभा धारवाड कर्नाटक …

Read More »

मुतगे पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ

  मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय, मुतगे येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीच्या सदस्या श्रीमती रेखा अंची या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्राचार्य पंकज देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात …

Read More »

‘पंढरीची वारी’ विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन

  फोंडा (गोवा) : एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा दहावा उपक्रम असून यंदाचा विषय ‘पंढरीची वारी’ असा निश्चित करण्यात आला आहे. हा उपक्रम २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात …

Read More »

निपाणी मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

    निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात विकास कामे रखडली आहेत. त्यांना चालना देण्याच्या मागणीचा निवेदन केपीसीसी सदस्य व महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी भेट बंगळुर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जरकीहोळी भेट घेऊन दिली. यावेळी निपाणी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसह सध्या सुरू …

Read More »

बीपीएल कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा १.२० लाखांवरून ३ लाखांपर्यंत : मंत्री मुनियप्पा

  बंगळूर : बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्ड मिळण्यासाठी सध्या लागू असलेली वार्षिक उत्पन्नाची १.२० लाख रुपयांची मर्यादा प्रशासनिक सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार व कायदेशीर मापनशास्त्र विभाग …

Read More »

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन

  निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बोरगाव सर्कलमध्ये दलित, समाजातील कार्यकर्ते, युवक आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद झाला होता. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. …

Read More »

राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा

    पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत आणि महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना केली. यंदाच्या …

Read More »

सोशल मीडियावरून मोर्चा-आंदोलनाचे आवाहन करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा; पूर्वपरवानगी अनिवार्य

  बेळगाव : सोशल मीडियावरून मोर्चा, आंदोलन, निदर्शने किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यापूर्वी बेळगाव शहर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय अशा प्रकारचे आवाहन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांनी प्रसिद्ध …

Read More »

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल विक्री केंद्रे, ढाबे, हॉटेल, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांकडून नियमानुसार शुल्क व कर आकारण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहेत. यासंदर्भात विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी सूचना देताना …

Read More »

नीट आंदोलनातील घोषणांच्या निषेधार्थ बेळगावात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन

  बेळगाव : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तसेच बंगळुरूमध्ये भाजप आमदारावर अंडीफेक करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस भवनाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोर्चा अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राणी चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चात …

Read More »