Sunday , September 20 2026
Breaking News

आनंदी जीवनासाठी आरोग्य आणि सकारात्मकता महत्त्वाची : अनंत लाड

Spread the love

 

संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंत लाड उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि विजय वाईगडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत लाड यांनी आनंदी जीवनासाठी मानसिक व भावनिक स्वास्थ्यासोबतच उत्तम आरोग्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अध्यात्मामुळे मन शुद्ध होते तसेच ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. त्यामुळे व्यक्ती मनाने व शरीराने तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. वयाच्या साठीनंतर विचारांमध्ये सकारात्मक बदल करून विविध छंद जोपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांचा अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विजय वाईगडे यांनी प्रार्थना सादर केली. नारायण कोरडे, रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, एम. एस. हुद्दार, स्वाती माने, अरविंद मुतगेकर आणि सोनी सरोदे यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. भरत गावडे यांनी कविता सादर केली.

शिवराज पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर के. एल. मजूकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *