बेळगाव : अनुसूचित जातीतील महिलेवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रांच्या माध्यमातून धमकावत तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी रफीक बेपारी याला बेळगाव येथील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सवदत्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करत …
Read More »मुंबई-बंगळुरू प्रवास होणार अधिक वेगवान; देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ अंतिम चाचणी टप्प्यात
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणी टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटिग्रल …
Read More »20 वर्षांपूर्वीच्या प्रक्षोभक भाषण प्रकरणात रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील यांची खानापूर न्यायालयात हजेरी
बेळगाव : शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि प्रसिद्ध व्याख्याते तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी शुक्रवारी खानापूर न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावली. २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित युवा महामेळाव्यात दोन्ही नेत्यांनी …
Read More »‘SIR’ अर्जां संदर्भात मतदारांच्या मदतीसाठी ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती’ची सहाय्य वाहिनी (हेल्पलाइन)
बेळगाव : ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ तर्फे बेळगाव दक्षिण, उत्तर, आणि ग्रामीण मतदारसंघातील मतदारांसाठी SIR प्रक्रियेत मदत करण्यासाठी म्हणून सहाय्य वाहिनी (हेल्पलाइन) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाभागात सुरू असलेला SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना अद्याप बी.एल.ओ. (BLO) कडून ‘SIR’ चे अर्ज मिळालेले नाहीत, किंवा कुटुंबातील काही …
Read More »खा. इराण्णा कडाडी यांच्या निधीतून बी. के. मॉडेल हायस्कूलला स्मार्ट बोर्डची भेट
बेळगाव : येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या बी. के. मॉडेल हायस्कूलला माजी खासदार इराण्णा कडाडी यांच्या निधीतून अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला. स्मार्ट बोर्ड उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. पाहुण्यांची ओळख बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अविनाश पोतदार यांनी करून दिली. मराठा लाईट …
Read More »पावसामुळे छत्र्या दुरुस्तीची लगबग
कारागिरांच्या हाताला पावसाळ्यात काम निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या छत्रीच्या दुरुस्तीची कामांची धांदल सुरू झाली आहे. त्यामुळे कारागरांच्या हाताला हंगामी स्वरूपात का होईना, काम मिळाले आहे. त्यामुळे येथील बस स्थानक परिसरात अनेक कारागीर दिवसभर छत्र्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. यंदा नवीन क्षेत्रांचे दरर वाढल्याने जुन्या छत्र्या …
Read More »पंचहमी योजना अंमलबजावणी समिती आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पंचायत हमी योजना अंमलबजावणी समितीची जुलै महिन्याची प्रगती आढावा बैठक तालुका पंचायत कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी होते. यावेळी कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांनी, …
Read More »कै. सुवर्णाताई आर मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त “मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न
बेळगाव : बस्तवाड (हा) दिनांक 10/07/2026 रोजी मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूलमध्ये 17 व्या कै. सुवर्णाताई आर मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्यांचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठल भावकाण्णा पाटील होते या कार्यक्रमाचे सर्वात मुलींच्या स्वागताने करण्यात आली त्यानंतर कै. सुवर्णाताई …
Read More »शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बिगुल; १३ जुलैला निर्णायक ऑनलाईन समुपदेशन
गैरहजर राहिल्यास ‘डमी कौन्सलिंग’द्वारे थेट नियुक्ती : धारवाड अतिरिक्त आयुक्त कार्यालयाचे वेळापत्रक जाहीर बेळगाव : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेला आता वेग आला असून, पुढील आणि महत्त्वपूर्ण टप्प्याला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षे एकाच कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन समुपदेशन (कौन्सलिंग) …
Read More »सिदनाळमधील अंतर्गत रस्ते, गटारींच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष
पूरग्रस्त भागातील निधीच्या गैरवापराचा आरोप निपाणी (वार्ता) : सिदनाळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील वॉर्ड नंबर २ मधील नागरिक नरक यातना सहन करावी लागत आहे. प्रभागामधील मरगुबाई गल्ली (हुन्नरगी रोड) येथील अंतर्गत रस्ते आणि गटारींची दुरावस्था झाली आहे. गेल्या १८ वर्षांपासून या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असून, जिल्हा पंचायत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta