Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला १ कोटी; सिंचन, क्लाऊड सीडिंगसह अनेक महत्त्वाचे निर्णय

बेळगाव : सुवर्णसौध येथे झालेल्या बेळगाव विभागीय प्रगती आढावा बैठकीत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या निधीचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी करावा, असे निर्देश त्यांनी दिले. राज्यात …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 11 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सीमाप्रश्नी पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बुधवार, दि. 8 जुलै रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा …

Read More »

आठ दिवसांच्या पावसानंतर बेळगावला दिलासा!

  शहरात पुन्हा वर्दळ; धोकादायक झाडांचा प्रश्न मात्र कायम बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने बेळगाव शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुन्हा सुरळीत होऊ लागले. बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा वर्दळ दिसू लागली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास …

Read More »

सीमाप्रश्नी महाजन आयोग अहवालच अंतिम; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे वक्तव्य

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाजन आयोगाचा अहवालच अंतिम असल्याची भूमिका मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत मांडली. सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हितांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव महानगरपालिकेत या संदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सीमावादाचा …

Read More »

बेळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; हेरॉईन व गांजा जप्त, चौघे ताब्यात

  बेळगाव : शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे ६.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणांमध्ये हेरॉईन आणि गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत सीसीबी पोलिसांनी ८ जुलै २०२६ रोजी केएचबी बास्केटबॉल कोर्ट, …

Read More »

बेळगावच्या ८१ वर्षीय वृद्धाचा मोबाईल हॅक करून तीन बँक खात्यांवर सायबर चोरांचा २१ लाखांवर डल्ला

  हरियाणातील टोळीचा संशय : शहर सायबर पोलिसांकडून तपास सुरू बेळगाव : सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाचा आणखी एक धक्कादायक नमुना बेळगावात समोर आला आहे. केवळ एका एपीके (APK) फाईलच्या माध्यमातून ८१ वर्षीय वृद्धाचा मोबाईल हॅक करत सायबर चोरट्यांनी तब्बल २० लाख ८८ हजार १६७ रुपयांवर डल्ला मारला. सदाशिवनगर येथील या …

Read More »

दिव्यांग संस्थेत कोट्यवधींच्या जमिनीच्या व्यवहाराचा स्फोट!

  खोटी कागदपत्रे, बनावट सह्या; अध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा बेळगाव : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या शहापूर येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅप्ड या संस्थेत कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारावरून गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला असून, खोटी कागदपत्रे तयार करणे, बनावट सह्या करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदारांसह सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहापूर …

Read More »

बेळगाव सीमावाद : महाराष्ट्राने तणाव वाढवणाऱ्या हालचाली करू नये; मंत्री प्रियांक खरगे यांचा इशारा

बेंगळुरू : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी महाराष्ट्र सरकारला बेळगाव सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात तणाव निर्माण होईल अशा कोणत्याही हालचालींना पाठिंबा देऊ नये, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावाद प्रकरणाच्या लवकर सुनावणीसाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात येईल, असे विधान केल्यानंतर …

Read More »

शहापूरमधील सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत कोसळली

  बेळगाव : बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शाहापूर परिसरातील ऐतिहासिक सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. शहापूर नाथ पै सर्कलजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत सततच्या मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. अखंड पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर …

Read More »

क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला पुन्हा उधाण; डॉ. अंजली निंबाळकरांकडून आ. विठ्ठल हलगेकरांवर निशाणा

  बेळगाव : विधान परिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला नव्याने उधाण आले असून, खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. निंबाळकर …

Read More »