Saturday , August 22 2026
Breaking News

ज्येष्ठ ग्रामीण मराठी साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय व निपाणी येथील साहित्यिक रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महादेव मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
प्रा. शिवाजी मोरे यांनी, महादेव मोरे यांची नव्याने प्रकाशित झालेली पुस्तके ग्रंथालयास भेट दिली. कबीर वराळे, एम. आर. ढेकळे, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. मंगलदास शिप्पूरकर, प्रमोद कांबळे, अनंत घोळवे, सुधाकर सोनाळकर, प्रकाश जाधव यांनी आपल्या मनोगतातून महादेव मोरे यांच्या आठवणी जागविल्या. कार्यक्रमास व्ही. ए. नगरे, पुंडे सर, माधुरी मेस्त्री, शिरगुप्पे सर (बेडकीहाळ), बाळासाहेब घस्ते, सलीम शेख, बाबासाहेब मगदूम, प्रा. एन. आय. खोत, प्रा.डाॅ. रवींद्र दिवाकर, प्रा. डाॅ. प्रवीणसिंह शिलेदार यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते.
प्रा. नानासाहेब जामदार यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : स्काऊट गाईड मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महेक जगदाळे व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *