Sunday , August 23 2026
Breaking News

रेनाॅटस् वेलनेसच्या आरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद

Spread the love

 

बेळगांव : स्कायहायच्या सौजन्याने येथील रेनॉटस् वेलनेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चांगल्या व निरोगी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पुण्याच्या सौ. प्रज्ञा बिर्जे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी जी. एस. एस. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
संयोजक सुहास देशपांडे यांनी प्रारंभी आरोग्याविषयी सखोल व उपयुक्त माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. यानंतर सौ. बिर्जे यांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
उपस्थितांपैकी काहींनी आपले अनुभव कथन केले.

सी रॉकच्या सभागृहात झालेल्या या शिबिरास डॉक्टर आशा भट, प्रविणकुमार फांडी, प्राजक्ता भोसले, नागेश काकती, प्रशांत आजगावकर, पूजा बाबर, स्मिता शिंदे, कॅनरा बॅंकेचे निवृत्त अधिकारी शेखर शिंगे, सौ. प्रेमा शिंगे आदी उपस्थित होते.
येत्या ६ सप्टेंबर रोजी आरोग्य व शेती ऊस उत्पादनासंबंधी पुन्हा शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

15 वर्षांनंतर मारीहाळमध्ये महालक्ष्मी यात्रा: यात्रेची तयारी आणि भाविकांच्या सुविधांबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांची बैठक

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मारीहाळ गावात सुमारे 15 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *