Friday , August 28 2026
Breaking News

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल कुडची यांच्या संयुक्त विद्यमाने हदनाळ (ता. निपाणी) येथील चव्हाटा मंदिरामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी रयत संघटनेचे निपाणी तालुकाध्यक्ष मधुकर पाटील यांनी स्वागत केले. तत्पूर्वी हदनाळ पीकेपीएस संघाचे संचालक राजाराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये डोळ्यांचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरु, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्यांच्या इतर २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
यावेळी दि हदनाळ दूध संघाचे चेअरमन केरबा पाटील, दिलीप यादव, संपतराव पाटील, थळू कांबळे, विलास पाटील, मयुर पाटील, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, गणपती पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, विनायक पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. रयत संघटनेचे हदनाळ शाखाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत रविवारी बागवान परिवारातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *