Friday , August 28 2026
Breaking News

नूतन मराठी विद्यालयातर्फे झाडांना राखी बांधून अनोखा उपक्रम राबविला

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालया तर्फे विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून “वृक्षराखी बंधन करून निसर्गाशी अतूट नाते हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील विविध वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून ते आपल्याला प्राणवायू, सावली, फळे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाचे योगदान देतात, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा”, “एक विद्यार्थी–एक वृक्ष” अशा घोषणांद्वारे जनजागृती केली. वृक्षांची काळजी घेणे, त्यांचे संगोपन करणे व अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक बाचणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महेश खोत, एस. एस. पचंडी, यू. आर. पवार, आर. एस. चव्हाण, एस. बी. पवार, व्ही. बी. पाटील, एस. आय. किंवडा, एस. आर. संकपाळ, यू. वाय. आवटे, ए. एम. कुंभार, एस. एस. कुलकर्णी, यू. एम. पाटील, एस. के. जोशी, एस. पी. जगदाळे, एस. आर. माने यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत रविवारी बागवान परिवारातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *