
देसूर : देसूर येथील कासम तळ्याच्या परिसरात नागरिकांसाठी ट्रॅकिंग पॉईंट, चालण्याचा मार्ग, बसण्याची व्यवस्था व विरंगुळ्याचे ठिकाण विकसित करण्यासाठी देसूर काँग्रेस कमिटी व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
या विकासकामास आमदार मा. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी मंजुरी दिली असून, पुढील कार्यवाहीसाठी कासम तळ्याचा एरिया व संबंधित उतारा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन ग्रामविकास अधिकारी/PDO मॅडम यांना देण्यात आले.
या प्रकल्पामुळे देसूर ग्रामस्थांना आरोग्यदायी वातावरण, सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी सुविधा आणि नागरिकांसाठी एक सुंदर विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष सातेरी काळसेकर, उचगांव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील, जोतिबा काळसेकर, राजेंद्र पाटील, नेताजी वासुलकर, रोहित तलवार, महादेव दळवी, सुरेश सुतार, बाबू पाटील, प्रकाश पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta