Friday , August 28 2026
Breaking News

पायोनियर बँकेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

Spread the love

 

बेळगाव : “येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 2025- 26 या आर्थिक वर्षात बँकेला 1 कोटी 94 लाखाचा ढोबळ नफा तर आयकर व इतर तरतुदिनंतर 1 कोटी 14 लाखाचा निव्वळ नफा मिळवला आहे” अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
120 वर्षे पूर्ण करून शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या बँकेची 120 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, पाटील गल्ली बेळगाव येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.

बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना ते म्हणाले की,”अहवाल सालात बँकेकडे 41 कोटी 92 लाख रुपयांची ठेवीमध्ये वाढ झाली असून कर्जामध्ये 30 कोटी 35 लाखाची वाढ झाली आहे. अशा प्रकारे बँकेकडे 31 मार्च अखेर 226 कोटी 42 लाखाच्या ठेवी असून 165 कोटी 36 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. बँकेच्या अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 5.76% असून एनपीए 1.97% आहे. बँकेला सलग चौथ्यांदा ऑडिट रेटिंग मिळाले आहे.

15% टक्के लाभांश

सलग चौथ्या वर्षीही अ वर्ग सभासदांना पंधरा टक्के तर ब वर्ग सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. साठ वर्षावरील वयाच्या व 25 वर्षे सभासद असलेल्यांना दोन हजार रुपयाचे गौरव धन दिले जात आहे. असेही ते म्हणाले. सध्या बँकेच्या मुख्य कार्यालयासह सात शाखा कार्यरत आहेत आणि नव्या 3 शाखा वगळता बाकीच्या सर्व शाखांचे कामकाज समाधानकारक आहे.

सभासदांच्या पाल्यांचा आज सत्कार
बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची नववी वार्षिक सभा उत्साहात

Spread the love    सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर; ग्रामीण भागातील पहिली सौहार्द संस्था ठरल्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *