
बेळगाव : चलवेनहट्टी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात महाप्रसादचे (परव) आयोजन करण्यात आले आहे यावेळी श्रावण महिनाच्या तिसऱ्या सोमवारी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी पहाटे पाच वाजता मंदिरात अभिषेक घालण्यात येणार आहे, त्यानंतर पुजा-अर्चा करण्यात येणार आहे. देवाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार आहे.
त्यानंतर दुपारी तीन वाजता महाप्रसादला सुरुवात होईल तरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta