खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात गटारातील पाणी सोडण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नंदगड पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृताची ओळख अमीर हुसेन पाश्चापूर (वय 48) अशी झाली आहे. तर अशोक …
Read More »हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचा बेळगावात एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जनावरांसह आंदोलन
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे जनावरांसह धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित दिरंगाईविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. धरणासाठी जमीन संपादित करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला व जमिनीचा परतावा मिळालेला नसल्याचा …
Read More »चव्हाट गल्लीत आठ दिवसांपासून पाणीटंचाई; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत, उद्यापर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाइपलाइन दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण …
Read More »पंधरा वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अन्नदानाची सेवा
निपाणीतील पठाडे कुटुंबीयांकडून वारकऱ्यांसह भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था निपाणी (वार्ता) : आषाढी वारीसाठी खडकेवाडा ते पंढरपुर ही दिंडी दरवर्षी जात आहे. या वारीचे येथील प्रगतीनगर येथे मंगळवारी (ता.१४) सायंकाळी आगमन झाले. या भागातील उद्योजक शिवाजी आण्णासाहेब पठाडे यांच्या घरी खडकेवाडा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा होऊन रात्री सर्व …
Read More »सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा; बेळगावात विविध संघटनांचे निदर्शन
बेळगाव : दिल्लीतील जंतरमंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच नीट परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बेळगावातील छत्रपती संभाजी चौकात विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी लडाखमधील प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, तसेच उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली. …
Read More »रस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास
खासदार प्रियांका जारकिहोळी; निपाणीत रस्ता कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघाचा रस्त्याच्या माध्यमातून विकास साधला जाईल. आवश्यक त्या गावातील प्रमुख मार्गावरील प्रमुख आणि संपर्क रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वच रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.जत्राट वेस येथील …
Read More »दोन वर्षांपासून बंद असलेला टेकाकडील चव्हाटा मंदिर शेतवडीचा रस्ता अखेर खुला
मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांना यश; शेतकरी वर्गात समाधान कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील टेकाकडील चव्हाटा मंदिराकडे जाणारा शेतवडीतील रस्ता गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांमधील वादामुळे बंद होता. अखेर दि. १२ जुलै २०२६ रोजी मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हा वाद मिटला आणि बंद पडलेला रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी …
Read More »सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक देण्याची एसडीएमसीची मागणी
मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील एस डी एम सी सदस्यांनी आज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करावा तसेच शाळेतील इतर प्रलंबित अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी शाळेतील वाढती विद्यार्थीसंख्या, नव्याने सुरू झालेले LKG-UKG वर्ग तसेच …
Read More »नो बॅग डे’मध्ये अमली पदार्थांविरोधी जनजागृती; तिसऱ्या शनिवारी शाळांमध्ये विशेष उपक्रम
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार कमी करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबविण्यात येतो. जुलै महिन्यातील या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शनिवार, १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘नो बॅग …
Read More »मतदार संघातील समस्यासाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय
खासदार प्रियांका जारकीहोळी; मतदार संघ काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील नागरिकांसाठी येथे काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी संगणक आणि ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. एस आय आर नोंदणी करून आपला मतदानाचा अधिकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta