निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्याची बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी रवाना झाली. येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी श्रींच्या पादुकांना शरद जोशी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भजन सेवा झाली. विधीपूर्वक विना पूजन, श्रींची पालखी पूजन झाल्यानंतर अभंग, भक्तीगीत, भावगीत, गवळण सादर करीत या दिंडीचे …
Read More »पांडुरंगाच्या भेटीची आस राहिली अधुरी; येळ्ळूरच्या पायी दिंडीतील वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
येळ्ळूर : धर्मराज गल्ली येळ्ळूर येथील सौ. शालन प्रकाश सायनेकर (वय 59) वर्षे या सोमवार (ता. 13) रोजी येळ्ळूर येथून निघालेल्या वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर ते पंढरपूर या पायी दिंडीतून चालत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्या अगदी व्यवस्थित दिंडीमध्ये चालत होत्या. गुरुवारी रात्री 1-30 वाजता अचानक …
Read More »23 वर्षांच्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम; युनियन जिमखान्याचा ताबा संरक्षण मंत्रालयाकडे
बेळगाव : शहरातील नामांकित क्रीडा संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनियन जिमखान्याच्या सुमारे 6.5 एकर जागेचा ताबा अखेर संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. तब्बल 23 वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालानंतर शेवट झाला. संरक्षण मालमत्ता कार्यालयाच्या कर्नाटक विभागीय अधिकारी दिव्या एस. होसूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी …
Read More »उत्कर्ष महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम; मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : नागरिकांच्या नेत्रआरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने उत्कर्ष महिला मंडळातर्फे गुरुवार, दि. १६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्रतपासणी शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. शिबिरात मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी सहभागी होत मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. शिबिराच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील या होत्या, तर प्रमुख …
Read More »बेळगावात १८ जुलै रोजी ‘काव्य लेखन कार्यशाळे’चे आयोजन; कवी शिवाजी शिंदे व गुणवंत पाटील यांचे लाभणार मार्गदर्शन
बेळगाव : मराठी साहित्यात रस असणाऱ्या आणि नवोदित कवी-कवयित्रींना दर्जेदार काव्य लेखनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी विश्व भारत सेवा समिती (बेळगाव), राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) आणि मंथन मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष ‘काव्य लेखन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, १८ जुलै २०२६ …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा : संत मीरा अनगोळ शाळेला सर्वसाधारण विजेतेपद
भावना बेर्डे, प्रथमेश हलगेकर वैयक्तिक विजेतेपद बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत संत मीरा अनगोळ शाळेने 242 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 211 गुणासह उपविजेतेपद तर देवेंद्र जीनगौडा स्कूलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, …
Read More »नाईंग्लजमध्ये सिद्धेश्वर पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन
पहिल्याच दिवशी ७० लाखांच्या ठेवी; ग्रामीण सहकार विस्ताराला नवी गती निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योग व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या जनवाड येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप. सोसायटी नाईंग्लज येथील तिसऱ्या शाखेचा प्रारंभ शिवप्रसाद देवरु स्वामीजी (अल्लमप्रभू सिद्धसंस्थान मठ, चिंचली) यांच्या …
Read More »निपाणी रोटरी क्लबचा शनिवारी पदग्रहण सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवारी (ता.१८) सकाळी ११ वाजता होणार आहे. २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी चेतन लगारे, सचिवपदी राजेंद्र सदलगे आणि खजिनदारपदी चिंतामणी वाळवे यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रमुख …
Read More »हरीनगरातील मराठी शाळेला प्रोजेक्टर लॅपटॉपसह गणवेशाची देणगी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हरी नगरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला शिला राहुल वालीशेट्टी यांनी देणगी स्वरूपात प्रोजकटर स्क्रीन व लॅपटॉप देऊन उपकृत केले. जर्मनीत वास्तव्य असलेल्या या दांपत्याने विद्यार्थ्यांना शनिवारचा पी. टी. रंगाचा गणवेश देऊन मुलांना प्रोत्साहित केले. त्यामुळे या दांपत्याचे कौतुक होत आहे. शिला वालीशेट्टी यांनी, …
Read More »डॉ. एन. डी. पाटील यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी
एस. एस. चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या “स्वावलंबी शिक्षण” या विचारधारेचा वारसा पुढे नेत डॉ. एन. डी. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी दिशा देत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta