Saturday , August 29 2026
Breaking News

बाग परिवाराचा ऑगस्ट महिन्याचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बाग परिवाराचा ऑगस्ट महिन्याचा कार्यक्रम नुकताच जत्ती मठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कवी-कवयित्रींनी विविध विषयांवरील आशयघन कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमात अशोक सुतार यांनी ‘का कशासाठी’, किरण पाटील यांनी ‘आई सोडून तुला वाऱ्यावर’, रोशनी हुंद्रे यांनी ‘तमाशा’, अस्मिता आळतेकर यांनी ‘या वळणावर’, प्रतिभा सडेकर यांनी ‘मैत्री’, गुरुनाथ किरमिटे यांनी ‘अनुभूती’, स्नेहल बर्डे यांनी ‘स्त्री तुझी व्यथा’, प्रा. महादेव खोत यांनी ‘रक्षाबंधन’, प्रा. ज्योतिबा नागवडेकर यांनी ‘माझं गाव’, अपर्णा पाटील यांनी ‘शब्दांशी मैत्री’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘मी लिहिलेल्या कविता’, तर स्मिता किल्लेकर यांनी ‘रिमझिम बारिश का मौसम’ या कविता सादर केल्या.

डॉ. मनीषा नाडगोडा यांनी ‘बंधन यह प्यार का’ ही हिंदी कविता सादर करण्याबरोबरच कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा सडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध विषय, भावभावना आणि सामाजिक आशय असलेल्या कविता कवी-कवयित्रींनी प्रभावीपणे सादर केल्याने संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय आणि बहारदार ठरला.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *