
बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यालय व आंतरशालेय हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुलांच्या संघातून विश्वेश्वरय्या महाविद्यालय विरुद्ध आरपीडी व मुलींच्या संघातून आरपीडी विरुद्ध मूडलगी महाविद्यालय तसेच
आंतरशालेय गटातून ताराराणी विरुद्ध भंडारी स्कूल त्यांतील हे अंतिम स्पर्धेत पोहोचले आहेत. अंतिम सामने आज दिनांक 29 रोजी सकाळी संपन्न होणार आहेत.
राष्ट्रीय क्रीडा दिन जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत जिल्हा योजना व डिपार्टमेंट ऑफ युथ एम्पॉवरमेंट व स्पोर्ट्स व हॉकी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान येथे हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
प्रारंभी हॉकी बेळगाव व हॉकीचा इतिहास तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, उपाध्यक्ष श्रीकांत आजगांवकर, सचिव सुधाकर चाळके, मनोहर पाटील, नामदेव सावंत, उत्तम शिंदे, स्वानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, शांताप्पा नरगोडी, डॉ. गिरीश माने प्रा.आनंद, प्रशांत मंकाळे चेतन दोडमणी, डिपार्टमेंट ऑफ युथ एम्पॉरमेंट व स्पोर्ट्स खात्यातर्फे बसवराज जकन्नावर व राजू महिंद्रकर तसेच आशा होसमनी, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, अश्विनी डुकरे आदी उपस्थित होते.
आजच्या हॉकी सामन्यांमध्ये 16 संघानी सहभाग घेतला होता. सामन्यांची उत्तम शिंदे, सीमा पवार, प्राजक्ता निलजकर, विजयालक्ष्मी, श्लोक मराठे, अभिषेक दोडमणी, सागर बबली यांनी पंचगिरी केली.
उद्या बक्षीस वितरण समारंभ
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हॉकी स्पर्धांचा उद्या नेताजी सुभाषचंद्र मैदानावर सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार हरिविजय, महापौर प्रीती कामकर, वेदांत सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सायनेकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, अभिनंदन पॉलिमरचे संचालक अभिजीत दडकर, जिल्हा नियोजन खात्याचे बी श्रीनिवास आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta