Friday , August 28 2026
Breaking News

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल अंतर्गत अलायन्स क्लब ऑफ वेणुग्राम या नव्या क्लबचा उद्घाटन व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल सीरॉक कॉलेज रोड मध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे सन्माननीय अध्यक्ष डी. बाला शास्त्री तसेच सचिव नागराज भैरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, माजी आमदार संजय पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ए ए हुगार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय संचालिका डॉ नवीना शेट्टीगार या नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना शपथ देणार आहेत.

या नव्या क्लबच्या अध्यक्षा म्हणून राजश्री हसबे शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत उपाध्यक्षा दीपाली देसाई, उपाध्यक्षा सुरेखा पाटील, खजिनदार जीवन कदम, सचिव पुरुषोत्तम हसबे आणि जनसंपर्क अधिकारी मदन बामणे हे पदाधिकारी पदाची शपथ घेणार आहेत.

या क्लब मध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सहभाग आहे.
अध्यक्षा राजश्री हसबे या बी कॉम पदवीधर असून खाजगी कंपनीत नोकरी सांभाळत समाजसेवेत सक्रिय आहेत. हिंडलगा येथे पतंजली योग सेंटर मध्ये त्या योग प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या जायंट्स सखीच्या सदस्या असून सध्या त्या सखीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

उपाध्यक्षा दीपाली देसाई या बी ए पदवीधर असून भाग्यनगर लक्ष्मी नारायण महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. महिलांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो.

उपाध्यक्षा सुरेखा पाटील या बी एस सी बीएड पदवीधर असून दूध शीतकरण प्रकल्पाच्या चालक आहेत. सोनोली-बेळगुंदी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्या समाजसेवेत अग्रेसर आहेत.

खजिनदार जीवन कदम हे मेकॅनिकल इंजिनियर असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे क्लास वन कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सचिव पुरुषोत्तम हसबे हे बी कॉम पदवीधर असून नुकतेच पोस्टल विभागातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. अखिल भारतीय स्टेनोग्राफर अँड पर्सनल असिस्टंट असोसिएशनचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव क्लबच्या कार्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

जनसंपर्क अधिकारी मदन बामणे हे मेकॅनिकल इंजिनियर असून गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेत कार्यरत आहेत. ते जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून संजीविनी फाउंडेशनचे चेअरमन आहेत. सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि विविध संस्थांशी असलेला संपर्क यामुळे अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या जनसंपर्काची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.
अलायन्स क्लब ऑफ वेणुग्राममध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. सविता देगीनाळ, मानसी निंबाळकर, शरद पाटील, मनोहर कालकुंद्रीकर, नीलम कदम, विद्या सरनोबत, संजय पाटील, विजय निंबाळकर, मिलिंद सुळगेकर, राम गुरव, मधुरा गुरव, स्नेहलता चौगुले, रेखा बामणे आणि ज्योती गवी, चंद्रा चोपडे हे क्लबचे सदस्य आहेत.

विशेष म्हणजे, क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य हे असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आजीवन सदस्य आहेत. त्यामुळे विविध सामाजिक, सेवाभावी आणि मानवतावादी उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठाशी जोडण्याची संधी या क्लबला मिळणार आहे.

“मैत्री, सेवा, जागतिक एकता” या भावनेतून कार्यरत असलेल्या अलायन्स क्लबच्या विचारांना बेळगाव परिसरात अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न नव्या क्लबच्या माध्यमातून केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कासम तळ्याच्या विकासासाठी देसूर काँग्रेस कमिटीचा पुढाकार

Spread the love  देसूर : देसूर येथील कासम तळ्याच्या परिसरात नागरिकांसाठी ट्रॅकिंग पॉईंट, चालण्याचा मार्ग, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *