Saturday , October 24 2026
Breaking News

मराठा रेजिमेंटमध्ये रंगला रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (मराठा एलआयआरसी) येथे पारंपरिक पद्धतीने आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा साजरा करण्यात आला.या सोहळ्याला मराठा एलआयआरसीचे कमांडंट, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, एसएम, व्हीएसएम, फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय, तसेच सर्व अधिकारी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी १० हून अधिक शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील २३८ विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिका, तसेच बेळगाव आणि आसपासच्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आजच्या या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी मराठा एलआयआरसीच्या अधिकारी, जेसीओ, इतर रँकचे जवान आणि अग्निवीरांना राख्या बांधल्या.

सैनिकांनी अभिमानाने आणि नम्रतेने राख्या बांधून घेताना देशवासीयांचे रक्षण करण्याच्या आपल्या अटळ वचनबद्ध कृतीला प्रतिसाद दिला.रेजीमेंटच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी, हा सोहळा भारतीय लष्कराची ओळख असलेल्या शौर्य, त्याग, सेवा आणि देशभक्ती या मूल्यांची अधिक सखोल जाणीव करून घेण्याची एक अविस्मरणीय संधी होती.

हा सोहळा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारतीय लष्कराचे लोकांशी असलेले चिरस्थायी नाते यांचे एक चैतन्यमय प्रतिबिंब होते. पवित्र धागा बांधण्याच्या औपचारिक सोहळ्यापलीकडे जाऊन, या प्रसंगाने समाज आणि त्याचे सैनिक यांच्यातील बंध अधिक दृढ केले आणि राष्ट्राप्रती विश्वास, एकता व सामायिक जबाबदारीची सामूहिक भावना अधिक मजबूत केली.

About Belgaum Varta

Check Also

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक

Spread the love  ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ; शिक्षण, सामाजिक उपक्रमांतून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प खानापूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *