Friday , August 28 2026
Breaking News

जिजामाता महिला सहकारी बँकेला ७७.४७ लाखांचा निव्वळ नफा

Spread the love

 

 

बेळगाव : बसवान गल्ली येथील जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेडची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा मंदिर येथे उत्साहात पार पडली. बँकेच्या चेअरपर्सन लीला गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सन २०२५-२६ मधील बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या आर्थिक वर्षात बँकेने ७७ लाख ४७ हजार ३०२ रुपये ३५ पैसे निव्वळ नफा मिळविल्याची माहिती सभेत देण्यात आली.

प्रारंभी नविता मोहिते व किशोरी शहापूरकर यांनी ईशस्तवन सादर केले. सहदेव कांबळे यांनी स्वागतगीत सादर केले. राजमाता जिजामाता तसेच बँकेचे संस्थापक कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या प्रतिमांचे पूजन चेअरपर्सन लीला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

चेअरपर्सन लीला पाटील यांनी बँकेच्या वाटचालीचा व विकासाचा आढावा घेतला. व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. अंदाजपत्रकाचे वाचन व्हा. चेअरपर्सन भारती किल्लेकर यांनी केले.

सभेत सन २०२५-२६ ची बँकेची आर्थिक आकडेवारी मांडण्यात आली. बँकेचे खेळते भांडवल ७७ कोटी ११ लाख ३६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शेअर भांडवल, कर्जवाटप, गुंतवणूक व राखीव निधी यांचीही माहिती सभासदांसमोर सादर करण्यात आली.

सभेची सूचना साक्षी चोळेकर यांनी मांडली. यावेळी संचालक भाविका होनगेकर, साक्षी चोळेकर, लता खांडेकर, मंगल नाईक, ॲड. मीनल मोदगेकर-देसाई, स्वाती चौगुले, संगीता कावीलकर, ॲड. उमा कांबळे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले. विनायक मोरे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

कासम तळ्याच्या विकासासाठी देसूर काँग्रेस कमिटीचा पुढाकार

Spread the love  देसूर : देसूर येथील कासम तळ्याच्या परिसरात नागरिकांसाठी ट्रॅकिंग पॉईंट, चालण्याचा मार्ग, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *