Saturday , August 29 2026
Breaking News

दोन कारची समोरासमोर धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

तुमकूर : जिल्ह्यातील चिक्कनायकनहळ्ळी तालुक्यातील गोडेकेरे गेटजवळ दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुरुवेकेरेकडून भरधाव वेगाने येणारी किया कार आणि चिक्कनायकनहळ्ळीकडून येणारी फोक्सवॅगन कार यांच्यात गोडेकेरे गेटजवळ जोरदार समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताबाबत चिक्कनायकनहळ्ळी पोलिसांकडून तपास सुरू असून मृतांची आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बेळगाव जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही

Spread the love  ८९ तालुक्यांत तीव्र दुष्काळ बंगळूर : राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *