Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंच्यात शिस्त, जिद्द व संघ भावना निर्माण होते : रोहिणी पाटील

    विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा बेळगाव : क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूमध्ये शिस्त, जिद्द, आणि संघ भावना निर्माण होते. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडाक्षेत्राचा फायदा घेऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल करावे व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासाठी कठोर मेहनत व सातत्य ठेवण्याचे आव्हान एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय …

Read More »

जवाहरलाल नेहरू तलावातील गाळ काढण्यासंदर्भात विविध प्रस्तावांसह नगरपालिकेला निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदायिनी असलेल्या जवाहरलाल नेहरू तलावातील साचलेला गाळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तातडीने काढून जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, येथील जवाहरलाल नेहरू तलावात अनेक वर्षांपासून गाळ …

Read More »

पावसाने डोळे वठारल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी; वाढत्या उन्हामुळे सोयाबीन धोक्यात

  निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनसह भाजीपाला आणि पिके धोक्यात आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली. मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा आधार घेतला आहे. …

Read More »

शिवारात शेतकरी, दारात शिक्षक; एसआयआर मोहिमेला खरीप हंगामाचा फटका

    बेळगाव : विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील शिक्षक-भूतस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामातील शेतीकामांमुळे बहुतांश शेतकरी दिवसभर शिवारात असल्याने “शिवारात शेतकरी, दारात शिक्षक” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मतदारांच्या भेटीसाठी बीएलओंना वारंवार हेलपाटे मारावे …

Read More »

बेंगळुरूत देशातील पहिले सरकारी प्रायोजित एआय विद्यापीठ; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा

  बेळगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगळुरूत भारतातील पहिले सरकारी प्रायोजित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना एआय शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळा उत्साहात

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील बेळगाव नाक्यावरील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये ‘नेतृत्व क्षमता प्रज्वलित करणारी परिषद’ होती. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देणे व त्यांना प्रेरित करणे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी …

Read More »

निपाणीत गणेश मूर्ती कामाचा ‘श्री गणेशा’ : शहर, ग्रामीण भागातील मंडळाकडून नोंदणी सुरू

  निपाणी (वार्ता) : यंदा जुलै महिन्यातील सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आणि परिसरात गणेश मूर्ती कामाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.या पर्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती शाडूच्या मूर्तींपेक्षा थोड्या स्वस्त मिळत असल्या, तरी नागरिकांच्या मागणीनुसार शहर व परिसरातील मूर्तिकारांनी शाडूच्या गणेशमूर्तीवरही सुबकतेचे हात …

Read More »

डॉ. कीर्ती अभय बिर्जे राजीव गांधी युनिव्हर्सिटीत द्वितीय

  बेळगाव : राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेस बेंगलोर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडी परीक्षेचा पदवीदान सोहळा 15 जून रोजी संपन्न झाला. यात शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या डॉ. कीर्ती अभय बिर्जे यांचा राजीव गांधी युनिव्हर्सिटीमध्ये द्वितीय क्रमांक तर शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरमध्ये एमडी अंतिम वर्षात प्रथम …

Read More »

पत्नी -मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत; इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे तीन वर्षीय मुलासह विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पती नागेश तळवार याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रेमा तळवार यांनी तीन वर्षीय मुलगा भुवन याच्यासह आत्महत्या केल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पती नागेश तळवार, सासू सुशीला …

Read More »

युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबाराचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

  बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयालगत असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणात एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरेश जाळगार हे क्लबमध्ये रमी खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे आला. त्यापैकी तिघांनी क्लबमध्ये …

Read More »