
निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी सभापती जुबेर बागवान आणि माजी नगरसेविका जस्मिन बागवान यांच्या संयुक्त विद्यमाने चिराग गल्ली येथील उर्दू शाळेत रविवारी (ता.३०) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट कर्नाटका अंतर्गत विविध सोयी देण्यात येणार आहेत.
शिबिरामध्ये जनरल आरोग्य तपासणी,
ईसीजी तपासणी, महिलांसाठी विशेष तपासण्या,डोळ्यांची तपासणी करुण पात्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
हृदयावरील सर्व उपचार मोफत (अँजिओप्लास्टी) असून इतर आवश्यक आरोग्य तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय जनरल मेडीसीन दमा, छातीचे विकार, न्युमोनिया जनरल सर्जरी कर्करोग, मुतखडा, प्रोस्टट स्त्रीरोग व वंध्यत्व उपचाराकरिता लागणाऱ्या शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया गर्भाशयाचे मुखाचे आजार सर्व प्रमारच्या लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कान, नाक,घसा निवडक शस्त्रक्रिया, नवजात बालक उपचार हार्निया, पिताशयाचे खडे ,कानातील श्रवणयंत्र दुर्बीणीद्वारे शास्त्रक्रिया, अपेंडीक्स शस्त्रक्रिया अतड्यांच्या सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.फुटलेले अॅपेंडिक्स, गालगंड, थॉयरॉइड दुर्बीणीद्वारे किडनीतील खडे काढून एक दिवसामध्ये घरी. ट्रॉमा केअर सेंटर कॅथलॅब व्यवस्था करण्यात आले आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जुबेर बागवान यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta