
बेळगाव (प्रतिनिधी) : श्रावण मास निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे वैश्यवाणी महिला मंडळातर्फे समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी मंदिराच्या सभागृहात कुंकुमार्चन संपन्न झाले.
वैश्यवाणी समाजाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात कुंकुमार्चनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी समाजातील अनेक महिलांनी सहभाग दर्शविला होता.
यावेळी या कुंकूमार्चनाचे यजमानपद सौ. अश्विनी कलघटगी यांनी भूषविले तर पुजारी रामेश्वर अवलक्की यांनी पौरोहित्य केले.
यावेळी श्री समादेवी प्रतिमेचे पूजन करून उपस्थित महिला वर्गांनी देवीला कुंकुमार्चन केले. नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.
याप्रसंगी वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षा सटवानी, सेक्रेटरी सौ. मंजुषा देवलापूरकर यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta